येवतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी संजय पाटील

0

बोदवड– येवती ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय बाळकृष्ण पाटील 657 मते मिळवून विजयी झाले. अन्य विजयी सदस्यांमध्ये शांताराम त्र्यंबक वाघ, गोपाल पुंडलिक माळी, अंजना कडू सुकाळे, केशरबाई शिवदास भील, यशोदाबाई रघुनाथ जंजाळ (बिनविरोध), नारायण रामदास घ्यार, मनीषा प्रदीप निळे, ममता समाधान मुळे, मांगो रामचंद शेजोळे, उषा अशोक सावरीपगार, छाया संजय विसाळे विजयी झाल्या.

गोळेगाव सरपंचपदी सविता शिंदे
गोळेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता माधवराव शिंदे 562 मते मिळवून विजयी झाल्या. येथे कॉँग्रेस पॅनल विजयी झाले. अन्य विजयी सदस्यांमध्ये शारदा अविनाश इंगळे, आशा बाळू अवचारे, प्रभावती चंद्रकांत पाटील, अनिता पांडुरंग अवचारे, प्रभाकर देवचंद मतकर, वंदना गणेश पाटील, वासुदेव गिरधर इंगळे, सीमा रवींद्र बेलदार, प्रतिभा सुरेश अहिरे विजयी झाल्या.