बोदवड : तालुक्यातील येवती गावात स्वतःच्या हाताने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांनी निर्जंतुकीकरण करण्यासाठी ट्रॅक्टरवरील कॉम्प्रेसरद्वारे स्वखर्चातून पॉवर स्प्रे फवारणी केल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक ेकले आहे. संपूर्ण गावातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्यावर होत आहे. पॉवर स्प्रे निर्जंतुकीकरण फवारणीला गावातील महेश अहिर, विनोद शिंदे, असिफ शेख, गुलाब मिस्त्री, रघु पाटील, बाळू पाटील, जितू ठाकूर, सुनील माळी, पोलिस पाटील पती राजू सावरीपगार, बंटी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य शांताराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य नारायण घ्यार, ग्रामपंचायत सदस्य उखा शेजुळे, विनायक पाटील, महादेव पाटील, जीतू पाटील, शुभम पाटील, समाधान लोखंडे, जीवन ठाकूर, गणेश लोखंडे हे उपस्थित होते.