पिंपरी-चिंचवड :- संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने 21 जून हा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची जाहीर करण्यात आले आहे. जगातील एकूण 175 देशांच्या प्रतिनिधींनी हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघापुढे आणला होता. त्यानुसार संपुर्ण जगभरात भारताचे वैशिष्ट असेलल्या योगाभ्यासाला महत्त्व आले आहे. या जागतिक योगदिनानिमित्त शहरभर उत्साह होता. सर्व उद्याने, चौक, सभागृह, शाळा, महाविद्यालये, मैदाने आबालवृद्धांनी सकाळी भरून गेली. विविध योगसंस्थांच्या प्रशिक्षकांनी ठिकठिकाणी जात योगाभ्यासाची माहिती दिली. तसेच सामुहिक योगासने करून घेतली. या सर्व उपक्रमाचे आयोजन विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांसह नगरसेवक, कंपन्यांनी केले. या योगदिनानिमित्त सर्वत्र उत्साह जाणवत होता.
प्रेरणा माध्यमिक विद्यालय
थेरगाव : येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालय व तुकाराम गुजर कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य यशवंत पवार, राजेंद्र देशमुख, देवयानी पवार, शैला हिरवे, दिलीप माळी, रुपाली कदम, स्वाती तपासे, देवयानी वारके आदी उपस्थित होते. पतंजली योग समितीच्या योगशिक्षकांनी योगाचे महत्व स्पष्ट करत विविध योगासनातील प्रकार विद्यार्थ्यांना समजावून दिले.
क्रांतीवीर चापेकर वाडा
चिंचवड : क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती, सोहम योग साधना आणि आपले चिंचवड व्यासपीठ यांच्यावतीने चापेकर वाड्यात 350 जणांनी योग साधना केली. यावेळी खासदार अमर साबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, प्रांत कार्यकारणी सदस्य विनायकराव थोरात, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, समितीचे सदस्य अशोक पारखी, गतीराम भोईर, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
योग शिक्षक दिगंबर उचगावकर व अनुजा उचगावकर यांनी योगाचे धडे दिले. यामध्ये पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, आसने, प्राणायामाचे धडे दिले. पूरक हालचालींमध्ये खांदा, कंबर, गुडघा, मानेचा व्यायाम, भद्रासन, भुजंगासन, दंडासन, ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवनमुक्तासन, सेतू, वंदावन अशी आसने करण्यात आली. सिद्धेश्वर इंगळे आणि अतुल आडे यांनी संयोजन केले.
अरविंद एज्युकेशन सोसायटी
जुनी सांगवी : येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात योगासन, प्राणायाम, शीर्षासन, योगमुद्रा, निद्रासन, सुर्यनमस्कार, गरुडासन अशी विविध आसने करून विद्यार्थ्यांनी योगदिनाचा आनंद लुटला. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, दीर्घायुष्य व निरोगी आयुष्यासाठी आपल्या जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच भारताने जगाला दिलेली फार मोठी देणगी म्हणजे योग शास्त्र आहे. बदललेली जीवन शैली व धकाधकीच्या जीवनात माणसाला वेळ भेटत नाही. यामुळे माणुस स्थुल होत चालला आहे. योग दररोज केला पाहिजे. यामुळे आपले शरीर व मन प्रसन्न राहते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
न्यू मिलेनियम स्कुल
दापोडी : येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी योग दिनात सहभाग घेतला. पद्मासन, भूमनासन, उष्टासन, मंडूकासन, सूर्यनमस्कार असे प्रकार घेण्यात आले. सूर्यनमस्काराचे महत्व त्यातील मुद्रेचे प्रात्यक्षिक यांची माहिती विद्यार्थ्याना करून देण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्याक्ष विजय जगताप, सचिव शंकर जगताप, सदस्य चंद्रक्रांत इंदुरे, विकास पवार, प्रताप बामणे, स्वाती पवार, मुख्याध्यापिका जयश्री माळी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ओम साई फाऊंडेशन
नवी सांगवी : ओम साई फाऊंडेशनच्या वतीने योगदिन साजरा करण्यात आला. ‘सध्या बदललेली जीवन शैली व धकाधकीच्या जीवनात माणसाला वेळ भेटत नाही. यामुळे लोक स्थूल होत आहेत. माणसाने योग दररोज केला पाहिजे. यामुळे आपले शरीर व मन प्रसन्न राहते. यामुळे आपण अनेक आजार मुक्त होऊ शकतो’, असे प्रतिपादन संजय मराठे यांनी केले. विक्रम धुमाळ व अविनाश इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबीर घेण्यात आले. यावेळी योगासन, प्राणायाम, शिर्षासन, योगमुद्रा, शवासन, सुर्यनमस्कार, गरुडासन अशी विविध आसने करून उपस्थितांनी आनंद लुटला.
गोविंद यशदा चौकात आबालवृद्धांचा सहभाग
पिंपळे सौदागर : येथील गोविंद यशदा चौकात नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, जयनाथ काटे सोशल फाउंडेशन, नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाउंडेशन, कुंदाताई भिसे सोशल फाउंडेशन आणि द आर्ट ऑफ लिविंग यांनी संयुक्तपणे योगदिनाचे आयोजन केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी प्रणवानंद यांनी योगाचे अनेक प्रकार नागरिकांकडून करून घेतले. तसेच योग व त्याची शक्ती याचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. शिबिरात लहान मुले, स्त्रिया तसेच जेष्ठ नागरिक अशा एक हजार जणांनी भाग घेतला. सर्वांना तुळस रोप देऊन सन्मानित करण्यात आर्ले.
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बर्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छवास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात.
-नगरसेवक बापू काटे
कार्यकर्त्यांनी घेतले परिश्रम
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयनाथशेठ काटे, आर्ट ऑफ लिव्िंहगचे स्वामी प्रणवानंदा, सत्यजित चड्डा, उद्योजक संजय भिसे, कुंदाताई भिसे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, पिंपळे सौदागर नवचैतन्य हास्य परिवारचे इंदू सूर्यवंशी, भागवत झोपे काका, विलास नगरकर काका, अनघा आटले, समिर देवरे, राजेश पाटील आणि आयोजक फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश कुंजीर आणि सागर बिरारी यांनी केले
चिखली गुरूकुल विद्यालय
चिखली : येथील गुरुकुल विद्यालय वृध्दाश्रमात आमदार महेशदादा लांडगे युवा मंच, फ प्रभाग स्वीकृत सदस्य संतोष मोरे यांनी योगशिबीर आयोजित केले. यावेळी गोरख मोरे, दत्तात्रय तरटे, विनायक आबा मोरे, तुकाराम मोरे, संजय सिनलकर, चेतन मोरे, नंदु लगाडे, महेश मोरे, मंगेश निंबाळकर, दत्तात्रय मोरे, विकास पंडीत, अशोक मोरे, गणेश मोरे, संतोष भांगरे, गोरक्षनाथ मोरे, समीर मोरे, पांडुरंग मोरे, दत्तात्रय बग, स्वप्निल मोरे, बाप्पुं अमराळे, उपासे, सुर्यवंशी उपस्थित होते. योगाशिक्षक गौतम सर, गोरख मोरे यांनी योगविद्याचे मार्गदर्शन केले. नगरसेवक संतोष मोरे यांनी आभार मानले. दत्तात्रय तरटे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कुदळवाडीत प्रतिसाद
कुदळवाडी : येथे आमदार महेशदादा लांडगे युवा मंच व फ प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्यावतीने योग व प्राणायाम शिबीर झाले.
प्रसाद मायभट्टे, काका शेळके, मनोज मोरे, पोपट यादव, किशोर लोढे, आकाश साळुंखे, विशाल उमाप, अमित बालघरे, रोहित जगताप, रामकुमार यावेळी पासवान, अमेरेश पासवान, गुरुराज कुंभार उपस्थित होते. योगशिक्षक चंद्रशेखर हरकरे, राजेंद्र पाठक यांनी मार्गदर्शन केले.
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे आयोजन
पिंपरी : महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर येथील साईकृष्ण उद्यानामध्ये योगसाने व प्राणायामांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातील सुमारे 500 नागरिकांनी सहभाग घेत योगसाने व प्राणायमची प्रात्याक्षिके केली. ऐश्वर्या जोशी यांनी प्रात्याक्षिके करून दाखविली. तसेच, योगाभ्यासाविषयी माहिती दिली.
शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राहिल्यास कोणत्याही क्षेत्रात चांगले योगदान देता येवू शकते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने व प्राणायाम आवश्यक आहे. माणसाच्या बुध्दीमत्तेत व स्मृतीमध्ये वाढ होण्यासाठी योगाभ्यासाचे विशेष महत्त्व आहे. योग हि संकल्पना मनुष्याच्या निर्मितीसाठी आहे. त्यातून माणसाचा सर्वांगीण विकास होऊन सुखशांती प्राप्त होते.
-एकनाथ पवार
डी. वाय पाटील महाविद्यालय
आकुर्डी : येथील डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य, महाविद्यालयात योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्राचार्य डॉ.मोहन वामन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हींगचे शिक्षक बबन राऊत यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योगाच्या सरावामुळे शरीर आणि मन कणखर होते त्याच बरोबर जीवनशैली ही सकारात्मक बनते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीेने योगा करणे आवश्यक आहे, असे सांगितले. शिबीराचे आयोजन क्रीडा संचालक प्रा.अमृता शिंदे यांनी केले.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय
आकुर्डी : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांसाठी योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. मनेाहर चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेष दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे आणि प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थिनी संचिता भोईर हिने महिला प्राध्यापकांकडून सूक्ष्म व्यायाम, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, मकरासन, शवासन यासारखी आसने दाखवून करूनही घेतली. डॉ. सविता कुलकर्णी यांनी प्राणायाम आणि ओंकाराची माहिती दिली. मोहसीन शेख या विद्यार्थ्याने प्राध्यापकांकडून सूर्यनमस्कार, ओंकार, प्राणायाम आणि आसने करून घेतली. सूत्रसंचालन प्रा. रामदास लाड यांनी केले. आभार प्रा. ज्ञानेश्वर चिमटे यांनी मानले.