योगसाधना : निरोगी जीवनाची गुरूकिल्ली

1

योग साधना म्हणजे काय ?
‘समत्वं योग उच्यते ।’ ‘चित्तवृत्ती निरोधः।’ म्हणजे शरीर व मन चंचल होण्यापासून रोखणे. योग शब्दांचा सोपा अर्थ जोडणे. योगामुळे संपूर्ण शारिरीक, मानसिक, सामाजिक स्वास्थ मिळते. त्यामुळे योगसाधनेला ‘होलिस्टिक सायन्स’ म्हणतात. योग म्हणजे अनुशासीत जीवन जगणे होय. योग म्हणजे सबबी, कारणे सोडून स्वतःसाठी वेळ काढत, स्वतःशीच संवाद साधण्याची एक पद्धत. जगभरातील अनेक देशांनी योगाभ्यासाला आपल्या जगण्याचा, दिनचर्येंचा आणि जीनवशैलीचा एक भाग कधीच बनलय. मग आपण सर्व भारतीय आपल्याच योगसाधनेला कधी न्याय देणार ? कधी अपलेसे कायमस्वरूपी करणार?

योगविज्ञानाचा इतिहास – सिंधू संस्कृतीपासून प्रत्येक युगात योगाचा उल्लेख मिळतो. योग विज्ञान हे अति प्राचीन शास्त्र आहे. अंदाजे साडे तीन हजार वर्षांपूर्वी महान ऋषी पंतजली यांनी मनुष्याच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी अष्टांग योगसाधनेची निर्मिती केली. पुढे परंपरागत योगाची नविन विज्ञानाशी सांगड घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य गुरू परमहंस माधवदासजी यांच्या आदेशावरून योगेंद्रजी यांनी केले. योगसूत्र व भगवद्गीता यातही योगसाधनेचा उल्लेख आहे. आचार्य गौडपाद, शंकराचार्य गोरक्षनाथ, स्वामी स्वात्मारा सुरी, नागेश भट्ट, स्वावी शिवानंद, रमण महर्षी, विवेकानंद, स्वामी सत्यानंद, महर्षी श्रीअरविंदो, महेशयोगी, पट्टाभिजौयस, बी.के. एस. अय्यंगार यांनी योगाचा जगभर प्रसार केला. घरेंड संहीतेत योग व प्राणायमाचा उल्लखे आहे. इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन हे योगतज्ञ होते. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि क्लिंटन यांनीही योगाचे धडे घेतले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी हे ही योगसाधना करायचे. सध्याच्या काळात ‘बाबा रामदेव, मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, स्वामी निरंजनानंद’ हे योगाचा जगभरात प्रसार करीत आहेत. अष्टांग योगसाधना – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार धारणा, ध्यान, समाधी हे महर्षी पंतजली यांचे निर्मित अष्टांग योग आहेत. योगसाधनेत सातत्य, श्रध्दा, समर्पण ह्या गोष्टी कायम लागतात.

यम – ज्यांचे पालन सामाजिक जीवनात केले पाहिजे त्यांना यम म्हणतात. अहिंसा, सत्य, अस्त्येय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे 5 यम आहेत.
नियम – ज्यांचे पालन वैयक्तिक जीवनात केले पाहिजे त्यांना नियम म्हणतात. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वरप्रणिधान हे 5 नियम आहेत.
असान – ‘स्थिर सुखं आसनं।’ शरीराची स्थिर (शिथील व सुखकारक अवस्था म्हणजे आसन होय. ) तणाव-दबाव, पीळ-संकोच, विस्तार-विरीतीकरण हे 6 प्रकार रोज केल्यास सर्व आजारांचा नाश होतो. दंड बैठका, शयन विपरीत शयन ह्याद मानवी अवस्थांनुसार आसने करायची असतात. दंडास्थितीचे आसने – एक पाद हस्तासन, वीरासन, त्रिकोणासन, जानुभालासन, पृष्ठासन, ध्यानासन, पद्मासन आदी. बैन्कीस्थितीचे आसने – शशांकसन, कपोतसन, पश्‍चिमोलासन, ंकधरासन, उष्ट्रासन, वज्र पाश्‍चितमोलानसन, वज्रविरासन, वक्रासन, अर्ध मत्सेंद्रासन आदी. शयनस्थितीचे आसने – व्दिपाद उत्तानपादासन, विपरीतकरणी, सर्वांगासन, हलासन, नौकासन,पवनमुक्तासन, शवासन आदी. विपरीतशयन स्थितीचे आसन – सरलहस्त भुजंगासन, शभासन, धनुरासन, नौकासन आदी. सुर्यनमस्कार – सुर्यनमस्कार हा एक परिपूर्ण यौगिक प्र्रक्रीया आहे. ही 10 टप्प्यात केली जाते. वय, क्षमता, उत्साह इ. बाबींनुसार सुर्यनमस्कार करण्याची संख्या ठरते. तरीपण कमीतकमी 5 व जास्तीतजास्त 25 सुर्यनमस्कार आपण रोज करू शकतो. सुर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत. योगनिंद्रा – आपल्या मेंदमतील काळजीवाहू केंद्राला उसंत मिळण्यासाठी शरीर शिथिल करण्यासाठी योगनिंद्रा आवश्यक आहे. योगनिद्रेमुळे शरीराला शंभर टक्के विश्रांती मिळते. जागृत, सुप्त, अंतर्मन अशा मनाच्या 3 अवस्था असतात. योगनिद्रेंमुळे ताणतणावाचे सुंदर व्यवस्थापन होते. अर्ध्या तासाची योगनिद्रा शरीर व मनावरचे सर्व ताण निवारण करते. ओमकार – संतापलेले, रागावलेले असतांना सरळ शांत बसावे. शरीर शिस्थिल करावे, दीर्घ श्‍वास घ्यावे, 11 वेळा ओमकार म्हणावा, राग जास्त असल्यास 25 वेळा ओमकार म्हणावा. प्राणायम – प्राण म्हणजे उर्जा. आयाम म्हणजे नियंत्रण. प्राणायामामुळे प्राणिक शक्तीवर नियंत्रण मिळवून योग्य गती व प्रमाणात पुर्ण शरीरात प्रवाहीत केले जाते. ही प्राणिक शक्ती श्‍वसनक्रीयेशी जोडली गेली आहे. नेहमी प्रत्येकाने आसने प्रथम करावीत, नंतरच प्राणायम करावेत, अनुलोम-विलोम व कपालभाती हे 2 चांगले प्राणायम प्रकार आहेत.प्रत्यहार – प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ध्यानाच टप्पे आहेत. जे वेगवेगळे दिसत असले तरी सलग आहेत.(क्रमशः)

– डॉ. अजय सोनवणे, सोनगीर