जळगाव। विश्वात योगाबद्दल असलेली व्याप्ती बघता आणि जगभारत प्रचार पसार व्हावा यासाठी केंद्र शासनाने एम ए इन योगा सुरु करण्यासाठी देशभरातील विद्यापीठात प्रयत्न सुरु केले आहेत.त्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देखील प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या विचाराधीन आहे. 2017-2018 सत्रापासून एम ए इन योगा या अभ्यासक्रमाला महाराष्ट्रातील 20 विद्यापीठात सुरवात झाली आहे.
योगाने शारीरिक व मानसिक त्रास देखील दूर
योगा एक प्राचीन भारतीय जीवन पद्धती आहे.ज्यात शरीर,मन आणि मस्तिष्कला पूर्ण स्वस्थ केले जाते.योगाने आजारच नव्हे तर यामुळे शारीरिक व मानसिक त्रास देखील दूर करता येतात. योगाचे जगभारत असलेले महत्त्व लक्षात घेता केंद्राने याकरिता गेल्या तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय योग दिवसही सुरु केला आहे.
21 जूनला विश्व योग दिवस साजरा
11 डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्र महासभेत प्रत्येक वर्षी 21 जूनला विश्व योग दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. यंदा 170 देशांपेक्षा जास्त देशांनी विश्व योग दिनात सहभाग घेतला आहे. याकरिता केंद्राने योगाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली मागणी आणि त्याबद्दल प्रचार पसार करण्याकामी एम ए इन योगा व पीएच.डी करण्याउसाठी योग तज्ञाचे मार्गदर्शन लाभणार आहे व तसा अभ्यासक्रम तयार होणार आहे.
दोन वर्षांचा अभ्यासक्रम
केंद्र शासनाने योगाचे तंत्रशुद्ध अध्ययन करणार्यास इच्छुक कोणत्याही शाखेच्या पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.याकरीता दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देखील योग अभ्यासक्रम सुरु करण्याच्या तयारीने आखणी करण्यास सुरवात केली आहे.त्यादृष्टीने प्रस्ताव पाठवला आहे.आणि एम ए इन योगा या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सदर अभ्यासक्रम सुरु होणार आहे.