योगींनी घेतली शहीद पोलीस कुटुंबियांची भेट

0

लखनऊ-उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे कथित गो-हत्येच्या संशयाने हिंसाचार घडून आला. यात पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली. दरम्यान आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. योगींनी सुबोध कुमार सिंह यांची पत्नी सुनिता आणि मुलगा श्रेय, अभिषेक यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.

योगींनी शहीद कुटुंबियांच्या एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.