योगेश भामरेंची पदावरून हकालपट्टी!

0

शिरपूर । भाजपा सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी कार्यरत असलेले साक्री येथील योगेश भामरे यांना पक्षाची प्रतिमा मालिन करत असलेल्या कारणाखाली पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे सोशल मीडियाचे काम पाहण्याची जबाबदारी योगेश भामरे यांना दिली होती. मात्र पदाचा गैरवापर करून जिल्ह्यातील अनेक अधिकार्‍यांकडून विविध कामांची माहिती मागवून अधिकार्‍यांना त्रास देण्याच्या तक्रारी भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाध्यक्षाने त्यांना अनेक वेळा समज दिली होती. मात्र भामरे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाल्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकल्याचे बबन चौधरी यांनी सांगितले आहे.