पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली माहिती
वासुली : बुट्टे पाटील यांच्यासारखा जिल्हा परिषद सदस्य आपल्या मतदार संघातील गाव-वाड्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतो. अशा धडपड्या माणसाच्या पाठीशी मी सदैव उभा असेल. गावातील विकासकामांसाठी मी पीएमआरडी सह विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध करून देणार असल्याचे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पाईट जिल्हा परिषद गटातील पिंपरी बुद्रुक गावातील 3 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे, खेड उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, तहसीलदार अर्चना यादव, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता दादासाहेब मुकडे, जि.प.सदस्य शरद बुट्टे पाटील, राजनभाई परदेशी, कालिदास वाडेकर, दिलीप मेदगे, पं.स.सदस्य चांगदेव शिवेकर, माजी सदस्य अमृत शेवकरी, विविध गावाचे सरपंच-उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमाणपत्रांचे केले वितरण
हे देखील वाचा
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बुट्टे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या अपंग तपासणी शिबिरातील 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे अशा अपंग पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषद गटातील गावांच्या विविध विकासकामांसाठी ठकर बाप्पा आदिवासी योजना, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद अशा विविध विभागातील मोठ्या प्रमाणात निधी मिळवून मंजूर झालेल्या विकासकामांच्या पत्रांचे वितरण करण्यात आले.
10 कोटींचा विकास निधी मंजूर
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक बुट्टे पाटील यांनी सांगितले की, पालकमंत्री बापट यांच्या कोट्यातून मतदार संघातील विविध गावांच्या विविध विकास योजनांसाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर व प्राप्त झाला आहे. ठाकूर पिंपरी या गावातील वाळूंज शिवार रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत 1 कोटी 61 लाख रुपये, लादवड रस्ता डांबरीकरण 35 लाख रुपये, हुंडारे शिवार साकावपूल 35 लाख रुपये, अंतर्गत सिमेंट रस्ते 17 लक्ष रुपये, आरोग्य उपकेंद्र वॉल कंपाऊंड 14 लक्ष रुपये, व्यायामशाळा साहित्य, हायमास्ट दिवे अशी एकूण 3 कोटी रुपयांची विकासकामांचे लोकार्पण आज झाले.