पिंपरी – चिंचवडमध्ये रंगकाम करतांना तोल जाऊन एकाचा मृत्यू

0

पिंपरी : इमारतीचे रंगकाम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा जागीस मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राधेशाम रामबच्चन वर्मा (वय ३३) असे त्या कामगाराचे नाव आहे.

राकेश वर्मा यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ठेकेदाराने कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाहीत. याप्रकरणी ठेकेदार तुषार पाटील, विजय बालवाडकर यांच्याविरुद्ध कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.