रक्तदान शिबिर जनजागृतीसाठी भुसावळात दुचाकी रॅली

0

भुसावळ – शिक्षण विभाग व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 7 रोजी सकाळी नऊ वाजता सिंधी कॉलनीतील आर.एस. आदर्श हायस्कूलमध्ये होणार्‍या रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी शनिवारी सकाळी दुचाकी रॅलीत काढण्यात आली. तब्बल 300 दुचाकीस्वार त्यात सहभागी झाले. प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर व दिव्यांग अनोश प्रमोद आठवले या विद्यार्थ्याच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला.ताप्ती पब्लिक स्कूल ते के. नारखेडे विद्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. रक्तदान शिबिराचे प्रकल्पप्रमुख गणेश फेगडे आहेत.