दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर
भुसावळ- युवा अवस्थेपासूनच आपण रक्तदान करीत असून आतापर्यंत 37 वेळा रक्तदान केले आहे. आता 38 व्या वेळेस रक्तदान करीत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गुप्त दान आहे. रक्तदानामुळे आत्मिक समाधान लाभते. आपण कोणाच्या तरी कामास आलो याचा आंनद मिळतो, अशी भावना दीपनगरचे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी व्यक्त केली. दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि दीपनगर रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी रक्तदान शिबिर झाले. मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या हस्ते धन्वन्तरी पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
182 दात्यांनी केले रक्तदान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ.उमेश कोल्हे यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार यांनी केले. शिबिरात 182 अभियंता, अधिकारी, कर्मचार्यांनी रक्तदान केले तर मोहन सरदार आणि शुभम सरदार या पिता-पुत्रांनी सोबत रक्तदान केले.आयोजकांच्यावतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
उप मुख्य अभियंता मोहन आव्हाड, नितीन पुणेकर, नंदकिशोर देशमुख, अधीक्षक अभियंते मधुकर पेटकर, मदन अहिरकर, हिंमतराव अवचार, दीपक जाधव,चिंतामणी निमजे, राजीव रेड्डी, प्रितम देशकर तसेच संकेत शिंदे उपमहाव्यवस्थापक (मासं) शांताराम पाटील, वरीष्ठ व्यवस्थापक वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत जाधव, डॉ.जयंत पाटील, कल्याण अधिकारी पंकज सनेर उपस्थित होते.