रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भाजपा जैन संघटना सज्ज

0

आमदार स्मिताताई वाघांनी सामाजिक दायित्व निभवण्यासाठी रक्तदात्यांना केले आवाहन

अमळनेर:देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणि अन्य विविध आजारांचे, शस्त्रक्रीयाच्या रुग्णांना रक्तदानाची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे ऐनवेळी अमळनेर शहरात कोणत्याही रुग्णासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून भारतीय जनतापक्ष आणि भारतीय जैन संघटनेतर्फे रक्तदात्यांची यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी तयार झाल्यानंतर रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह अमळनेर शहरासह तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांनी भाजपाच्या आणि जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन आमदार स्मिताताई वाघ यांनी केले आहे.

बहुतांश उन्हाळ्यात रक्तचा पुरवठा कमी होत असतो. त्यात कोरोनाच्या प्रसार सुरू झाला आहे. तसेच विविध आजाराचे रुग्ण आणि शस्त्रक्रियाच्या रुग्णांना मोठ्याप्रमाणावर रक्त पुरवावे लागते. त्यामुळेच रक्ताची मागणी वाढू शकते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहेत. त्यामुळे आपल्या रक्