जळगाव। शहरातील उमंग सृष्टी स्कुलने चाळीसगाव पोलिस स्थानकात शनिवार 5 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेट देण्यात आले. तसेच अविरत आपल्या सुरक्षेचे व्रत घेतलेले पोलीस काका यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर तेथील सहकार्यांनी मुलांचे स्वागत केले. त्यानंतर तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय कुमार बोचरे सरांनी मुलांचे स्वागत केले व मुलांशी संवाद साधला. त्यानंतर उमंग स्कूलच्या अध्यक्षा सौ .संपदाताई उन्मेश पाटील यांनी मुलांना पोलिसांच्या अविरत कामाबद्दल व आपली सुरक्ष करण्यासाठी रात्रंदिवस घेत असलेल्या मेहनातीबद्दल सहज व सोप्या भाषेत समजून सांगितले.
विद्यार्थ्यांना रायफल व पिस्तूलांची दिली माहिती
संपदाताई पाटील यांनी तेथील सपोनि विजय कुमार बोचरे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उमंग महिला मंडळाच्या अध्यक्ष सुवर्णा राजपूत यांनी पीएसआय प्रशांत दिवटे यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. तसेच उमंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी तेथील उपस्थितीत असलेले पीएसआय विजय कुमार बोचरे, पीएसआय प्रशांत दिवटे, पीएसआय पणजे, नायब तहसीलदार विशाल सोनावणे, मधुकर पाटील, गणेश पाटील, वाहतूक निरीक्षक सुरेश शरसाठ आदींना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस यांनी विद्यार्थ्यांना रायफल व पिस्तुल यांचे प्रात्याक्षिके दाखून माहिती दिली. त्यानंतर तेथील विविध विभागाविषयी मुलांना थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनमधील कारागृह मुलांना दाखविण्यात आले. वाईट काम केल्यानंतर होणारी कैद्यांची दुर्दशा प्रत्येक्षपणे दाखवून जीवनात सद्वर्तन का असावे हे सहज व सोप्या भाषेत संपदा पाटील यांनी समजून सांगितले. यावेळी पूर्वी महाजन, वृषाली पाटील, शीतल पाटील, भाग्यश्री व्यास, उल्हास पाटील भगवान बच्छे आदि उपस्थित होते.