रघुराम राजन काहीही सांगतील पण कर्जमाफी करणारच – कमलनाथ

0

भोपाळ– मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ उद्या शपथ घेणार आहेत. कॉंग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान आता सगळीकडे कॉंग्रेस कर्जमाफी करणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र कर्जमाफीवर माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी कर्जमाफी केल्याने राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला जाईल असे वक्तव्य केले आहे. यावर कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे आवश्यक असून ते करणार असल्याचे बोलले आहे.

कमलनाथ यांनी शेतकऱ्यांची अवस्था गंभीर असून कर्जमाफी करणे आवश्यक झाले आहे असे सांगत कर्जमाफी करणार असल्याच्या आश्वासनावर ठाम असल्याचे सांगितले.

कॉंग्रेसने निवडणूक प्रचारात १० दिवसात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथविधी होणार असून सरकार स्थापन होणार आहे.