रघूनाथ महाराज महोत्सवाचे आयोजन

0

चिंबळी : केळगांव( ता खेड.)येथे शुक्रवारी (दि.9) व शनिवारी (दि.10) रघुनाथ महाराजांचा उत्सव साजरा करण्यात येणार असुन या निमित्त मदिंराला विधुत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला असुन रघुनाथ महाराजांच्या उत्सवा निमित्त शुक्रवारी पहाटे काकडआरती, महापुजा, अभिषेक व सकाळी मिरवणुक तसेच सायंकाळी रघुनाथ महाराजांच्या पालखीचा छबीना व आरतीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच करमणुकीसाठी काळूबाळू यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणारआहे. शनिवारी लोकनाट्य तमाशा तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा ठेवण्यात आला आहे करमणुकीसाठी शैलेश लोखंडे लिखित ऑर्केस्ट्रा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे