रजनीकांतचा बहुप्रतीक्षित ‘पेटा’चा ट्रेलर रिलीझ !

0

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा नुकताच २.०हा चित्रपट प्रचंड गाजला. आता त्यांचा आगामी ‘पेटा’हा चित्रपट येणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रजनीकांतशिवाय प्रसिद्ध कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी, विजय सेथुपत्ती, सिमरण आणि त्रिशा हे कलाकारही आहेत.

अॅक्शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरुन दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.