रजाळेत शॉर्टसर्कीटमुळे लागली आग; घर भस्मसात

0

नंदुरबार । नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील शॉर्ट सर्किटने घर जळून खाक झाल्यामुळे लाखोचे नुकसान झाले. रजाळे येथील शेतकरी रोहिदास रघुनाथ पाटील यांच्या घराला सकाळी 8 ते 9 या दरम्यान भिषण आग लागल्यामुळे संसारोपयोगी वस्तू पूर्णता जळून खाक झाल्यामुळे संसार उघड्यावर आला आहे. यावेळी आग विझविण्यासाठी ग्रामस्थ तसेच युवकांनी जिकरीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. रोहिदास पाटील यांचे लाकडाचे घर होते.

ग्रामस्थांनी विझविली आग
आगीने रौद्ररोप धारण केल्यामुळे युवकांनी घराच्या छतावर चढून मोठी कसरत करून लाकडे तसेच दाबली वरील माती खाली फेकून आग आटोक्यात मदत झाली. यापुढे ही आग वाढतच असल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी यावेळी नंदुरबार येथे अग्नीशमक दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत टी.व्ही.संच, गोदरेज कपाट व त्यातील साहित्य तसेच 70 हजार पैशांची रोख रक्कम तसेच सोने व संसारोपयोगी वस्तू आणि घर पूर्ण जळून खाक झाले. यावेळी महसूल विभागातर्फे पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शेतकरी रोहिदास रघुनाथ पाटील यांनी तीन ते चार वर्षापूर्वी घरांचे बांधकाम केले होते. शेतात तसेच मजूरी करून एक-एक रूपया जोडून घर पूर्ण केले. मात्र शणातच डोळ्यासमोर घराची राख लागोळी झाली. यावेळी रोहिदास पाटील त्यांच्या पत्नी कोकीळा पाटील यांना अश्रू अनावर झाले.