ट्रॉलीवर व्हॅन धडकल्याने तीन जागीच ठार

0

साक्री । साक्री-नवापूर मार्गावर रविवार रात्री इच्छापूर गावाजवळ एका नादुरुस्त ट्रॉलीला मारुती व्हॅन धडकल्याने अपघात झाला. या अपघातात व्हॅनमधील तीन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. मृत व जखमी महिला धुळ्यातील असून या अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे.

मारुती व्हॅनचालकाचा अंदाज चुकला
रविवार रात्री 11.30 च्या सुमारास नादुरुस्त झाल्याने एम.एच.18/एन-2854 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली इच्छापूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. त्याचवेळी मागावून येणार्‍या एम.एच.17/एई-2018 या क्रमांकाच्या भरधाव वेगातील मारुती व्हॅनने त्या ट्रॅक्टरला धडक दिली. चालकाला ट्रॉलीचे वेळीच भान न आल्याने हा अपघात झाला.

साक्री-धुळे मार्ग ठप्प
या अपघातात युसूफ शेख नथ्थु (75, रा.बिस्तीगल्ली, बारापत्थर, धुळे), शेख आसिफ शेख युसूफ (49) व साजनबी शेख असलम (40, दोघे रा.वडजाईरोड, जुन्यानाक्याजवळ धुळे) हे तिघे जागीच ठार झाले तर शेख नसीर शेख गुलाब (70),शेख आबेदाबी शेख नासीर (65, दोघे रा.-तिरंगाचौक झोपडपट्टी, धुळे), शेख निजाम सुलतान शेख आसीफ (40, रा.बिस्तीगल्ली, बारापत्थर, धुळे) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहासह जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविले. या अपघातामुळे साक्री-धुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.