मुंबई :‘ब्रम्हास्त्र’या चित्रपटातून रणबीर कपूर आणि आलिया भट एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आलिया भट्टला या चित्रपटाच्या सेटवर पायाला दुखापत झाली. यावेळी आलिया तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत जाताना दिसली. या दोघांना जुहूच्या एका रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट करण्यात आहे.
आलियाला ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दुखापत झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रणबीर जुहूच्या एका रुग्णालयात तिला घेऊन गेला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.