मुंबई : बॉलीवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अलिकडेच लग्न केलं. सध्या रणवीर ‘सिम्बा’चं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. अशातच तो एका सिंगिंग शोमध्ये मध्ये गेला होता यावेळी त्याने दीपिकाविषयीच्या काही मनातल्या गोष्टी सांगितल्या.
‘गोलिंयो की रासलीला रामलीला’ या चित्रपटादरम्यानच रणवीरच्या मनात दीपिका बसली होती. चित्रीकरणावेळी रणवीरने दीपिकाला नगाड्यावर नाचताना पाहिले आणि त्याचक्षणी रणवीरच्या मनात दीपिका घर करून गेली. तेव्हापासून तो दीपिकाला प्रेम आणि सन्मान करायला लागला. दीपिकाचे हे टॅलेंट त्याला खूपच आवडले होते आणि त्यावेळी तो शोमध्ये सर्वांसमोर म्हणाला माझ्या वाईफने जे काही केले ते एकदम शानदार होते.