मुंबई : बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांच्या ‘सिम्बा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान चित्रपटाच्या टीमने काही मजेशीर किस्से शेअर केले.
https://www.youtube.com/watch?time_continue=54&v=tBZwHR1CHcI
काही दिवसांपूर्वी साराने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने कार्तिक आर्यनला डेट तर रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा सांगितली होती. या गोष्टीवरुन तिला एक प्रश्न विचारण्यात आला, यावर उत्तर देत सारा म्हणाली, ‘रणवीर का तो बार-बार, लगातार एनकाउंटर हो गया है और ऐसी शेरनी से हुआ है की अब मैं तो कुछ नहीं बोलूंगी, दीपिका पादुकोण हैं वो हम कुछ नहीं बोलेंगे, शादी मुबारक सर.’ दीपिका तर बॉलिवूडची शेरनी आहे आणि रणवीर फक्त तिचाच आहे. यामुळे रणवीरपासून दूर राहायला पाहिजे. असं म्हणतं तिने या प्रश्नच ऊत्तर दिला.