जळगाव: रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे सर्व शोरूम,अहिंसा तीर्थ गोशाळा व आर.सी. मेटल इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री फंडात ६ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, आमचे संस्थापक संचालक रतनलाल सी. बाफना यांनी कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री फंडात ५ लाख व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फंडात १० लाख रुपयांची मदत दिली आहे. जेव्हा लॉकडाऊनचा निर्णय झाला तेव्हा फर्मचे युवा संचालक राहुल बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी मार्च महिन्याचे वेतन लवकर अदा केले. यापूर्वीही कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले जातात. संचालकांचे कर्मचारी व समाजाप्रति असलेले हे भान लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनीही एकमताने मुख्यमंत्री फंडात ६ लाख रुपयांचा निधी देण्याचे ठरविले आहे. यानुसार सोमवारी आरटीजीएसने रक्कम पाठविली जाईल असे मनोहर पाटील यांनी कळविले आहे.
आमच्या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असतात.जेंव्हा महाराष्ट्र किंव्हा देशावर संकट येते तेव्हा तेव्हा त्यात आर्थिक योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असतो.आज आमचे कर्मचारी सुद्धा संस्थेच्या पाऊलावर पाऊल ठेवून मदतीसाठी पुढे आले आहे,ही गोष्ट मनाला खुपच समाधान देणारी आहे.
सुशिल बाफना
संचालक:
रतनलाल सी बाफना ज्वेलर्स