नवी दिल्ली। टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा आणि विद्यमान चेअरमन एन चंद्रशेकरन यांच्यासहित ८ संचालकांना कोर्टाने मानहानीची नोटीस पाठविली आहे. वाडिया गृपचे चेअरमन नुस्ली वाडिया यांनी टाटांच्या विरोधातमानहानीचा दावा दाखल केला आहे.
याबाबत पुढील सुनावणी २५ मार्च २०१९ मध्ये होणार आहे. १४ डिसेंबर रोजी वाडिया यांनी आपले म्हणणे कोर्टात मांडले. रतन टाटा, चंद्रशेकरन के, अजय पीरामल, अमित चंद्रा, इशात हुसैन, नितिन नोहरिया, रेनेंद्र सेन, विजय सिंह, वेनु, श्रीनिवासन, राल्फ स्पेथ, एफए सुबेदार आदींना नोटीस पाठविण्यात आली आहे.