जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे लेह-लडाख मॅरेथान पूर्ण करणार्या ‘रनर’ तसेच ‘पूल डिनर’ तयार करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला. गणपती नगरातील रोटरी हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख अतिथी जळगाव रनर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण बच्छाव, क्लबचे अध्यक्ष शामकांत वाणी, मानद सचिव ऍड.पुष्पकुमार मुंदडा, कार्यक्रम प्रमुख जतीन ओझा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किरण बच्छाव यांनी पॉवर पॉंईट सादरीकरणाद्वारे लेह-लडाख येथील माहिती देत या आव्हानात्मक स्पर्धेसाठी 12 आठवडे केलेली पूर्व तयारी व तेथील सात दिवसांचा सराव याविषयी माहिती दिली. 1500 पैकी 200 स्पर्धक स्पर्धा पूर्ण करु शकले नाहीत. मात्र जळगावच्या आठही स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली असे सांगितले. किरण बच्छावसह अविनाश काबरा, विक्रांत सराफ, गुरुप्रसाद तोतला, मिलन जैन, ऍड.सागर चित्रे ऑर्कि.मिलींद राठी, डॉ.विवेक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
क्लबच्या महिला समितीतर्फे महाराष्ट्रीयन वेशभूषेसह, महाराष्ट्रीयन पदार्थ पूल डिनरसाठी तयार करणार्या अपर्णा भट-कासार, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा.स्नेहलता परशुरामे, संगीता देशमुख, ज्योत्स्ना रायसोनी, मनिषा पाटील, सुरेखा वाणी, लीना पाटील, प्रतिभा वाणी, स्नेहल भिरुड, संगीता पिंपरकर, प्रा.सुनीता चौधरी आदिंचा सत्कार करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात 100 टक्के उपिस्थती देणार्या डॉ. विलास महाजन, भुवनेश्वर सिंग, विष्णू भंगाळे, कल्पेश दोशी, ऍड. प्रशांत महाजन, राजेंद्र पिंपरकर, महेंद्र गांधी, रवींद्र वाणी यांचाही गौरव करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सवर निवड झाल्याबद्दल माजी अध्यक्ष महेंद्र रायसोनी, शिक्षक गौरव सोहळा व शाडूमाती मूर्ती कार्यशाळा आयोजनातील सहभागाबद्दल विष्णू भंगाळे व सुपर डान्सर महाराष्ट्र स्पर्धेच्या मुंबई स्टुडिओ राऊंडसाठी निवड झाल्याबद्दल मयंक सुशील राका यांचा सन्मानित करण्यात आले. आभार डॉ. राहूल मयूर यांनी मानले.
यशस्वीतेसाठी जतीन ओझा, महिला समिती प्रमुख निता जैन, सुरेखा वाणी, ऍटेंडन्स कमेटी चेअरमन संजय जैन (धोका), फेलोशिप कमेटी चेअरमन रोशन पगारिया आदिसह सर्व रोटरी सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी परिश्रम घेतले.