‘रन भुसावळ रन’साठी 180 स्पर्धकांनी केली नोंदणी

0

यंदा 1500 स्पर्धकांना मिळणार प्रवेश ; ऑनलाईन नोंदणीचीही सुविधा

भुसावळ- ‘रन भुसावळ रन’ साठी नाव नोंदणी सुरू असून आतापर्यंत 180 स्पर्धकांनी नोंदणी केली असून त्यातील 110 इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले. गतवर्षी सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आल्यानंतर भुसावळकरांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवला होता तर गतवर्षाप्रमाणेच यंदाही पोलिस प्रशासनाने स्पर्धेसाठी नियोजन केले आहे. यंदा उपक्रमाचे दुसरे वर्ष असून 13 जानेवारी होणार्‍या स्पर्धेसाठी 3 डिसेंबरपासून नाव नोंदणीस सुरूवात झाली असून तीन, पाच आणि 10 किलोमीटर अंतरासाठी तीन गटांमध्ये स्पर्धा होईल. यंदा प्रथमच ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. 3 ते 5 डिसेंबरपर्यंत 110 स्पर्धकांनी ऑनलाईन तर 70 स्पर्धकांनी प्रत्यक्ष नोंदणी केली, असे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले. या स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍यांना टी शर्ट, बॅग, ब्रेकफास्ट, मेडल, प्रमाणपत्र, भुसावळ रन लोगो दिला जाणार आहे. यंदा केवळ एक हजार 500 स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.