रब्बी हंगामासाठी तातडीने एकरी दहा हजार रुपये द्या

भारतीय किसान संघाची निवेदनाद्वारे विविध मागण्या 

शिंदखेडा(प्रतिनिधी)- खरीप हंगामाचे नुकसान भरपाई व रब्बी हंगामासाठी तातडीने एकरी दहा हजार रुपयाची शेतकरी सहायता निधी देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय किसान संघातर्फे नायब तहसीलदार शारदा बागले यांना देण्यात आले यावेळी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी संजीव गिरासे,नरेंद्रसिंग गिरासे,संदीप चौधरी, संदीप पवार, सुनील पवार, मिलिंद पवार, तुषार सुर्वे, दिलीप पवार,हेमराज पारकर, प्रवीण पारकर,सुभाष माळी, संजय चौधरी,योगीराज चौधरी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना ही निवेदन पाठवण्यात आले

निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील अभुतपूर्व दुष्काळ सदृश्य परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रस्ताव पारित केला आहे की” दुष्काळाचे संकट

सुसह्य व्हावे यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि सर्वसमावेशक असा सर्वांगीण जलसंधारण

आणि चारा विकास कार्यक्रर्यम राबविण्याची आवश्यकता आहे.”याकरीता खरीप हंगामाच्या नूकसान भरपाईसाठी व रबी हंगामासाठी तातडीने एकरी रुपये10000 शेतकरी सहाय्यता निधी म्हणनू देण्यात यावा,इथनू पढुे जो पाऊस पडले तो पाऊस विविध जलसंधारण पद्धतींचा उपयोग करून साठवण्यासाठी प्रोत्साहन व जनजागृती कार्यक्रर्यम योजना जाहीर करावी, राज्याचे पुढील 12 महिन्यांसाठी जनतेसाठी पाणी व ग्रामीण भागात उपजिविकेसाठी रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना केल्या जाव्यात.तसेच, पशुधनासाठीही चारा अंदाजपत्रं व पाणी अंदाजपत्रक तयार करून उपलब्धतेसाठी व वापराच्या नियोजनासाठी आवश्यक त्या पायाभतू सविुधा, निधी व सहाय्य उपलब्ध करून द्यावे.दुष्काळाच्या काळात शतकेऱ्यांना नाईलाजाने अत्यल्प दरात पशधनु विकावे लागते ते टाळण्यासाठी

कमी पाण्यामध्ये तग धरू शकणारी चारा पिके (उदा. दशरथ घास) रब्बी हंगामामध्ये लावण्यासाठी चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे.

तसेच, शासनाच्या कृषी विद्यापीठांच्या क्षेत्राचा पूर्ण वापर करण्यात यावा. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात चारा पिके लावावी यासाठी प्रोत्साहन योजना

जाहीर करावी यासह विविध मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.