रावेर- मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यास सुरूवात झाली असून या महिन्यात समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपवास करतात. शिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्याने या कालावधीत वीज भारनियमन करण्यात येवू नये, अशी मागणी शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 18 मे पासून मुस्लीम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास सुरूवात झाली. या महिन्यात समाजबांधव पवित्र, असा रोजा उपवास करतात मात्र यंदा रमजान महिना हा भर उन्हाळ्यात आला असून मुस्लीम समाजाच्या भावना लक्षात घेवून या कालावधीत वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा वीजपुरवठा खंडीत अथवा भारनियमन करण्यात येवू नये शिवाय रमजान ईदच्या दिवशी वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा सेनेच्या वतीने देण्यात आला.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
शिवसेनेचे अल्पसंख्याक उपजिल्हा संघटक डॉ.शेख मोहम्मद आदील अजहर यांनी विज वितरण कंपनीचे उपअभियंता यांच्याकडे दिले आहे. निवेदनावर अविनाश पाटील, योगीराज पाटील, राकेश घोरपडे, कन्हैया गनवाणी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.