शहादा : राज्यात ‘ कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील मुस्लिम सेवा संघ व नगरसेवकांनी रमजान ईद होईपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद ठेवावी , अशी मागणी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे केली आहे .
निवेदनाचा शहरालगत अठरा किलोमीटरवर मध्य प्रदेश व गुजरातची सीमा आहे . तेथे ‘ कोरोना’चे रुग्ण आहेत . नंदुरबार शहरातही रुग्ण आढळून आले आहेत . शहादा तालुक्यात फळपिकांचे उत्पादन मोठे असल्याने बाहेरील व्यापाऱ्यांची ये – जा असते . त्यातच एक स्थानिक व्यापारी बाधित होऊन त्याचा मृत्यू झाला . आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . रमजान ईदनिमित्त शहरात कापड दुकान , बूट , चप्पल , सौंदर्यप्रसाधने यांसह इतर वस्तू विक्रीच्या दुकानांना सुरू ठेवण्यास अनुमती दिली , तर बाजारात नागरिकांची गर्दी वाढेल . त्यामुळे रमजान ईद होईपर्यंत शहादा शहरातील बाजारपेठ बंद ठेवावी , असे म्हटले आहे .निवेदनावर मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मुज्जफर अली सैय्यद,शहराध्यक्ष जावेद पठाण, नगरसेवक वाहिद पिंजारी,रियाज कुरेशी,ॲड.दानिश पठाण,ईक्बाल शेख,साजिद अन्सारी, अकलाख अन्सारी,वसीम तेली, डॉ . अजहर पठाण,नगरसेवीका शमियाबी हकीम कुरेशी, जाहिदाबी रहिम पिंजारी , हकीम कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत