रमाईंचे विस्मरण होऊ देऊ नका : चाबुकस्वार

0

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये रमाई जयंती साजरी

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे बी. एस. कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, आयुष्यभर ज्यांनी माणुसकीचे हक्क मिळविण्यासाठी बंड पुकारले. स्पृश्यांशी हा झगडा एकट्याने लढला व माणसाला माणुसकीचे हक्क मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. या महान कार्यात त्यांची पत्नी माता रमाई यांनी आयुष्यभर अनेक हाल अपेष्टांना तोंड देत डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये.

यावेळी प्रमुख पाहुणे लेखक बी. एस. कांबळे, बाळासाहेब शेंडगे, बुध्दभूषण हिरवे, दत्ता पुरी, इरफान शेख, संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि मुख्याध्यापिका श्रीविद्या, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीविद्या यांनी केले. पाहुण्यांचे आभार शिवांगी निस्ताने यांनी केले.