दोघा भावंडांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे दिले निर्देश
सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला संशय
हे देखील वाचा
मुंबई:– लोकशाहीर साठे महामंडळ घोटाळाप्रकरणात राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एक नवा संशय व्यक्त करत या प्रकरणातील आरोपी रमेश कदम आणि त्यांचे भाऊ उमेश कदम यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे निर्देश तुरुंग अधीक्षकांना दिले आहेत. यासंदर्भात माहिती देताना कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीआयडीने या महामंडळ घोटाळ्याशी संबंधित सर्व आधीच कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ती पूर्ण इमारत ताब्यात घेतली होती. सील केली होती. मात्र तरीही कदम यांचे बंधू उमेश यांच्यासह कहाणी लोकांनी पूर्ण नासधूस केली आणि साहित्य पळवले. या लोकांनी जेलमध्ये जाण्यासाठी हे कृत्य केलेय, असा संशय. ठरवून प्लॅन करून यांना आत बोलावले असावे, असा संशय कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
कांबळे यांनी सांगितले कि, आरोपी कदम यांच्या भावासह अन्य ४-५ लोकांवर पोलिसांनी दरोडा, शासकीय कार्यालय तोडफोड असा गुन्हा दखल केला. उमेश कदम आणि साथीदाराला अटक केली. आज ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जर सीआयडीने कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत तर असा प्रयत्न केले. रमेश कदमांनी जेल मध्ये बोलावून घेऊन कटकारस्थान करण्याचा संशय येत आहे.
म्हणून तुरुंग प्रशांसाला निर्देश दिले की यांना एकत्रित ठेवू नये. जेल प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत, अशी माहिती कांबळे यांनी दिली.
जर जायचं होतं तर गाडी स्टिकर असलेली का घेऊन गेले. सीसीटीव्ही असतानाही का गेले?
सर्व प्रकरणाचा विचार केल्यानंतर जेल मध्ये कारस्थान करण्याचा संशय आहे. जेलमध्ये जाण्यासाठी हे कृत्य केलेय. ठरवून प्लॅन करून यांना आत बोलावले असावे. रमेश कदम यांचे वर्तन अतिशय वादग्रत राहिले आहे. म्हणून यांना एकत्रित ठेवू नये असे निर्देश दिले असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 88 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांना निलंबित केले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.