मुंबई । कबड्डी महर्षी बुवा साळवींच्या पावलावर पाऊल ठेवून कबड्डीच्या विकासासाठी झटणार्या दिवंगत रमेश देवाडीकर यांच्या स्मरणार्थ राज्य कबड्डी संघटनेतर्फे पुढील वर्षापासून श्रमयोगी पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची 59 वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना संघटनेचे अध्यक्श किशोर पाटील यांनी सांगितले. या सभेस 25जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी व आजीव सभासद उपस्थित होते. सभेचे प्रास्तविक अध्यक्षांनी देवाडीकर यांच्या शोक प्रस्तावाने केले.
या सभेला खास उपस्थित असलेले अजितदादा पवार यांचे सचिव सोलवट यांनी राज्याच्या कारभारात जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . याकरिता जिल्हा संघटनेने देखील राज्य संघटनेस सहकार्य करणे गरजेचे आहे. असे सांगितले. महाकबड्डीचा विषय या सभेत निघाला असता खेळाडू व राज्य संघटनेचे हित लक्षात घेऊनच यापुढे या करिता योग्य व्यक्तीशी बोलणी केली जातील. असे अध्यक्षांनी सांगितले. सभेच्या विषयाला अनुसरून आलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे अध्यक्षांनी दिली.