रमेश पाटील लिखित दुसर्‍या पुस्तकाचे आज प्रकाशन

0

चोपडा : तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी चोपडा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा पत्रकार, जेष्ठ कवी रमेश पाटील यांचे लिखित दुसर्‍या कविता संग्रहपाखरा ‘उड उड रेचे प्रकाशन राज्याचे विशेष सरकारी वकील अड उज्वल निकम यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस हे उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षी 1 जून रोजी ’उन्ह तापली रे’या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले होते. आज रविवार 4 रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता चोपडा येथील कन्या विद्यालय गणेश कॉलनी येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांकडून केले आहे.

कार्यक्रमास यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, पंकज समुहाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले तर विशेष मान्यवर म्हणून माजी आमदार कैलास पाटील, जगदीश वळवी, अ‍ॅड घनश्याम पाटील, माजी जि.प. सदस्य पी.सी. पाटील, इंदिराताई पाटील, पं.स. सभापती आत्माराम म्हाळके, उपसाभपती एम.व्ही.पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हा परिषेदेचे आरोग्य सभापती, दिलीप युवराज पाटील, कवी अशोक सोनवणे, डॉ. संजीवकुमार सोनवणे (धरणगाव), कवी मिलिंद बागुल(जळगाव) किमया प्रकाशनचे आर.डी.पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे, बीडीओ ए.जे. तडवी, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. आयोजक दोडे गुजर संस्थान जळगाव चे संचालक प्रवीण पाटील, गजानन रमेश पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन केले आहे.