यवत । दौंड-सिद्धटेक रोडवर देवळगावराजे येथे क्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. 13) शेतकर्यांना उसाचा पहिला हप्ता 3000 रुपये द्यावा यासाठी सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात आले.
शासनाने उसाची एमआरपी वाढविली तशी पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरायला सुरुवात केली, असे रयत क्रांतीचे भानुदास शिंदे यांनी वक्तव्य केले. हे कारखाने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी पक्षाचे असतानाही शेतकर्यांच्या उसाला भाव न देता बोंबा मारत हिंडत आहेत, असा टोला बारामतीकारांना दीपक भोसले यांनी लगावला. पुणे जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी पहिला हप्ता 3000 रुपये त्वरित द्यावा, उसाच्या कारखान्यावरील वजन काटे सार्वजनिक पारदर्शक ऑनलाइन करावेत, साखरेचा उतार सार्वजनिक समाजनेसाठी शुगरब्रिक्स मशीन हे शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या लेखी स्वरूपाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी माऊली आहेर, सर्फराज शेख, सयाजी मोरे आदी उपस्थित होते. कुंडलिक शिंगाडे यांनी आभार मानले.