रयत सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कोल्हे

0

चाळीसगाव। शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदीर सभागृहात 9 जून रोजी रयत सेनेची संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रयत सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल कोल्हे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी समाधान मांडोळे, तालुका संघटकपदी किरण लोहके, शहर उपाध्यक्षपदी योगेश पाटील, शहर संघटकपदी गणेश देशमुख यांची निवड करण्यात आली.

यावेळी रयत सेना प्रदेश समनन्वक पी.एन.पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्हे, सूर्यकांत कदम, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शहर उपाध्यक्ष शुभम देशमुख, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष मयुर चौधरी, निबा पाटील, चेतन पवार, मगेश देठे, सुरज ठाकूर, मगेश पवार, अमोल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.