एरंडोल : एरंडोल तालुक्यातील रवंजे बु.॥ गावातील 22 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. सिकंदर उस्मान खान (22) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवार, 3 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मामांकडे केली आत्महत्या
समजलेल्या माहितीनुसार, मयत सिकंदर हा तरुण मूळचा जळगावचा रहिवासी असून तो रवंजे बु.॥ येथे मामा बिस्मिल्ला गफुर मुसलमान यांच्याकडे वास्तव्यास होता व हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. तरुणाने अचानक केलेल्या आत्महत्येने हळहळ व्यक्त करण्यात आली. एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.