रविंद्र सपकाळे यांना राष्ट्रपती पोलीस पुरस्कार जाहीर

0

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार रविंद्र सपकाळे यांना राष्ट्रपती पोलीस पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातून केवळ श्री.सपकाळे यांनी निवड झाली आहे. आज पोलीस कवायत मैदानावर होणार्‍या ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री यांच्याहस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सीआरपीएफच्या दोन अधिकार्‍यांनाही पोलीस पदके जाहीर झाले आहेत. मुंबई येथील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेश्याम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांना ही पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

सहाय्यक फौजदार वसंत सपकाळे यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, चाळीसगाव, जळगाव जिल्हा पेठ, नशिराबाद पोलीस स्टेशन, अमळनेर, यावल या ठिकाणी सेवा बजावली आहे. सद्या ते जळगाव पोलीस मुख्यालयात विशेष विभागात कार्यरत आहे. श्री.सपकाळे यांनी वरणगाव येथे 2 आणि अमळनेर येथील 3 गुन्ह्यातील आरोपींना शोधून त्यांच्या विरोधात भक्कम पुरावा न्यायालयाच्या वेळेत पुर्ण केल्यामुळे संबंधीत गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आले. लवकरच त्यांना राज भवनात राष्ट्रपती प्रतिनिधी म्हणून राज्यपाल यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रविंद्र सपकाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाल्यानंतर सर्वत्र अभिनंदन होत आहे.