रविवारी जंगम समाजाचा स्नेहमेळावा

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जंगम समाज संस्थेच्यावतीने जंगम समाजाच्या कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच 10वी व 12वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजातील विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी काशिधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे होणार आहे.