चाळीसगाव । बेलगंगा सहकारी साखर कारखाना लि. कारखान्याच्या कर्मचाछयांची चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 2 वाजता येथील भडगाव रोडवरील मिलगेट समोरील श्री. मारोती मंदीराच्या पटांगणात करण्यात आली असून या चर्चेसाठी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन बेलगंगा सहकारी साखर कारखाना एम्पलॉईज् च्या वतीने प्रसिध्दीपत्रका द्वारे करण्यात आले आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्यांची बैठक 5 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 2 वाजता चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील मिलगेट समोरील श्री. मारोती मंदीराच्या पटांगणात चर्चा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी औरंगाबाद खंडपीठाचे अॅड.एस.एस.कुलकर्णी हे हायकोर्टात युनियन च्या चालु असलेल्या कामकाजा संदर्भात माहीती देणार असून कारखान्याच्या सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे अशी विनंती बेलगंगा सहकारी साखर कारखाना एम्पलॉईज् युनियनचे अध्यक्ष बापुराव पाटील, जनरल सेव्रेैटरी हिम्मतराव देसले यांचेसह हनुमानसिंग पाटील, सुमेरसिंग पाटील, भिकन पाटील, शेषराव बच्छे, साहेबराव निकम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.