रवी शास्त्रीची मागणी बीसीसीआयने फेटाळली

0

नवी दिल्ली । भारतीय संघाच्या सहयोगी स्टाफमध्ये स्वत:च्या मर्जीतल्या माणसांची वर्णी लावणार्‍या रवी शास्त्री यांची सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी सल्लागार नेमण्याची मागणी बीसीसीआयने फेटाळली आहे. बीसीसीआयच्या या पवित्र्यानंतर शास्त्री यांनी घुमजाव केले असून राहुल द्रविड भारतीय संघाचा फलंदाजीचा सल्लागार झाल्यास काहीच अडचण नसल्याचे म्हटले आहे. माजी कर्णधार राहुल द्रविडसाठी सल्लागार म्हणून भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत असं शास्त्री म्हणाले आहेत. यापुर्वी भारताचा महान क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरची फलंदाजीचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची इच्छा शास्त्रींनी व्यक्त केली होती.

भारताचा महान क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरची फलंदाजीचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची इच्छा शास्त्रींनी व्यक्त केली होती. मात्र,शास्त्रींची ही मागणी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडलजी यांनी फेटाळूनलावले. सचिन आयपीएलमधील फ्रॅचायझीशी करारबद्ध आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर द्रविड जाणार
यावर्षीच्या शेवटी भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार आहे. या दौर्‍यासाठी राहुल द्रविड सल्लागार म्हणून भारतीय संघासोबत जोडला जाऊ शकतो अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. एका मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले, भारत-अ आणि अंडर-19 संघांना राहुल द्रविडचा खूप फायदा झाला.भारतासाठी सल्लागार म्हणून द्रविड जोडला गेल्यास काहीच अडचण नाही. पण यासाठी द्रविड संघासाठी कसा उपलब्ध होईल हे बीसीसीआयने बघावे असे शास्त्री म्हणाले.