रसलपूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रावेर : तालुक्यातील रसलपूर येथे अल्पवयीन 12 वर्षीय बालिकेच विनयभंत करण्यात आला. या प्रकरणी एका अल्पवयीन बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेचा दोन महिन्यांपूर्वी व शुक्रवार, 5 रोजी आरोपीने पाठलाग करून विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास महिला उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.