रावेर- तालुक्यातील रसलपूर आश्रमशाळा परीसरात एकाचा झोपेत उलटी झाल्याने मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे. रसलपूर येथील आश्रमशाळा निवासस्थानी राहणार्या धनराज रमेश धनगर (31) यांना गुरुवारी रात्री 11.20 वाजेच्या सुमारास झोपेत उलटी झाल्यानंतर तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी तपासणी केली असता त्यांनी धनगर यांना मयत घोषित केले. याबाबत रावेर पोलिसात आश्रमशाळा चौकीदार संजय महाले यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार गफूर शेख करीत आहेत.