रसेल अ‍ॅडम्स टी-20 ग्लोबल लीगच्या स्पर्धा

0

जोहान्सबर्ग । टी20 ग्लोबल लीगच्या स्पर्धा संचालकपदी अनुभवी क्रीडा व्यवस्थापक रसेल एडम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केपटाऊनमध्ये जन्मलेले एडम्स जागतिक क्रिकेट वर्तुळात एक नावाजलेले नाव आहे.

यावर्षी नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या या नव्या टी20 क्रिकेट स्पर्धेसाठी अ‍ॅडम्स यांचा अनेक वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि क्रीडा व्यवस्थापनाचा अनुभव नक्कीच कामी येईल. या नव्या जबाबदारीपूर्वी अ‍ॅडम्स हे गेली 9 वर्ष भारतातच काम करत होते. आयपीएलमधील टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कमर्शिअल, ऑपरेशनल तसेच क्रिकेट अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहात होतेसंचालकपदी