तळेगावः तळेगाव ते चाकण रस्त्यावर रहदारीचा भाग असलेल्या तळेगाव फाटा ते मनोहर नगर दरम्यान रास्ता दुभाजक बसवावेत अशी मागणी तळेगाव स्टेशन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल आणि दिलीप डोळस यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव चाकण मार्गावर सध्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यावर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, भाजी मार्केट, व्यापारी संकुल असल्यामुळे हा रस्ता खूप रहदारीचा झाला आहे. येथील रहदारीस शिस्त लागावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या करिता या भागामध्ये रस्ता दुभाजक बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.