रस्ते व गटारीची कामे त्वरित व्हावीत :रहिवाश्यांची मागणी

भडगाव : (प्रतिनिधी)

भडगाव नगरपरिषदे मार्फत कॉलनी भागात रस्त्यांची आणि गटारींची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी अशी मागणी भडगाव शहरातील कॉलनी वासिय करीत आहेत .

कोठली रस्त्यालगत रघुनाथ नगर परिसर , भवानी बाग परिसर , गट नं .२७ आणि श्रीराम मंगल कार्यालय बाजुचा परिसर तसेच बाळद रोड परिसर आणि शहरातील इतर कॉलनी एरिया या भागात रस्त्याची कामे आणि गटारींची कामे त्वरित करावी अशी मागणी या भागातील रहिवाश्यांनी नगरपालिकडे कलेली आहे . तशा आशयाचे निवेदनही त्यांनी नगरपालिकेला दिलेले आहे . या परिसरात काही भागात रस्त्यांची आणि गटारीची कामे न झाल्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल् झालेले आहे . पावसाच्या पाण्यामुळ सगळीकडे चिखल झालेला आहे त्यामुळे या चिखलातून नागरिकांनी चालावे लागते .आपली वाहने चालविताना देखिल खूप कसरत करावी लागते . तरि नगरपालिका प्रशासनाने या बाबद गांभिर्यपूर्वक विचार करून त्वरित या परिसरात रस्त्यांची आणि गटारीची कामे चालू करावीत अशी अपेक्षा आहे . या विषयाचे निवेदन नगरपरिषद भडगाव मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना या कॉलनी भागातील रहिवासी परिमल पाटील , राजेश पाटील , मोहन पाटील , तुषार पाटील , ईश्वर महाजन यांनी दिले आहे .