रस्ते हस्तांतरणाला विरोध

0

भुसावळ। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या 500 मीटर आतील दारुची दुकाने बंद झाल्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी रस्त्याचे हस्तांतरण पालिकेकडे करण्यासाठी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले आहे. मात्र यामुळे शहरात पुन्हा दारुची दुकाने सुरु होवून युवावर्ग व्यसनाधिन होवू शकतो. त्यामुळे शहरातील रस्ते पालिकेकडे अवर्गीकृत करु नये, अशी मागणी जनाधार विकास पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांसह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले असून आमदार संजय सावकारे यांनी महसुलमंत्र्यांना दिलेल्या पत्रावरुन शहरातील बंद दारुची दुकाने सुरु करुन त्यांची स्वार्थीनिती उघड झाली असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे.

आर्थिक हित साधण्यासाठी दारु दुकानांना सहकार्य
तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे सुध्दा आमदारांच्या भुमिकेचे समर्थन करीत आहे. या विषयास पुर्णतः विरोध असून शहरातील गोरगरीब नागरिकांच्या संसाराची दारुमुळे राखरांगोळी होत असतांना सर्वोच्च न्यायालयाने दारुविक्रीला लगाम घालून काही निकष जाहिर केले. मात्र आमदार सावकारे हे ही बंद दारुची दुकाने पुन्हा सुरु करुन युवकांना व्यसनाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करत दारु विक्रेत्यांकडून आर्थिक हित साधत दुकाने सुरु करण्यासाठी सहकार्य करीत असल्याची टीका जनाधारतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उशिराने सुचलेले शहाणपण
तसेच आमदार सावकारे हे सार्वजनिक बांधकाममंत्री यांना पत्र देवून बांधकाम विभागाचे रस्ते नगरपालिकेकडे अवर्गीकृत करण्यासाठी पत्र देवून विनंती करीत आहे. यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असल्याची टिका जनाधारने केली आहे. आमदारांनी 2013 मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्र्यांना भुसावळ शहरातील रस्त्यांच्या निधीसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्यासाठी विनंती पत्र देेत त्यात विशेष सुचना म्हणून सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र आता या विपरीत मागणी करुन उशिराने सुचलेले शहाणपण ते दाखवत असल्याचेही जनाधारतर्फे नमूद करण्यात आले आहे.

यांनी दिले निवेदन
नगरपालिका हि स्वायत्त संस्था आहे. तिच्या न्याय व हक्कासाठी पत्रव्यवहार करुन शहरातील रस्ते हे नगरपालिकेमार्फत कटरावे अशी मागणी केली होती परंतु तत्काललीन पालकमंत्री असताना सावकारेंनी पालिेकेतील सत्ताधार्‍यांचे मागणीचे राजकारण करीत बदनाम केले होते. कारण रस्ते ते स्वत: करीत आहे असे त्यांना दाखवायचे होते मग आज हे उशिराने सुचलेले शहणपण ते दाखवत आहे असल्याचे जनाधारचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरपालिकेने रस्ते अवर्गिकृत करण्यासाीं समर्थन दिले तर जनाधार पार्टीतर्फे सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर गटनेता उल्हास पगारे, जगन सोनवणे, सचिन पाटील, सिकंदर खान, राहुल बोरसे, दुर्गेश ठाकुर यांच्या स्वाक्षर्‍या आहे.