जळगाव। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा रस्त्यांचे जळगाव मनपाकडे हस्तांतरणाला विरोध करण्यासाठी जळगावकरांसाठी आयोजित स्वाक्षरी मोहिमेत आज 10 हजारावर जळगावकरांनी सहभाग नोंदवला. यात महापौर नितीन लढ्ढा व आमदार सुरेश भोळेंसह मनपाच्या अनेक लोकप्रतिनिधींनी स्टेडीयम जवळच्या केंद्रावर जावून सही करून सक्रीय सहभाग नोंदवला. डॉ. राधेशाम चौधरी यांच्या जळगाव फर्स्ट या संघटनच्या नेतृत्वात जळगाव शहरातील सुमारे 30 पेक्षा जास्त सामाजिक संघटनांनी आपापल्या भागात स्वाक्षरीचे स्टॉल लावले. या स्टॉलवर नागरिक उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी करण्यासासाठी येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
लोकप्रतिनींधींनी नोंदविला सक्रीय सहभाग
स्टेडीयम जवळच्या केंद्रावर आमदार भोळे व महापौर लढ्ढांसह नगरसेवक नितीन बरडे, पृथ्वीराज सोनवणे, अमर जैन, विनोद देशमुख, करीम सालार, प्रदीप तळवलकर, दीपक आरडे, प्रविण पाटील, रोटरीचे पदाधिकारी डॉ. राजेश पाटील, लक्निष्तीमीकान्नत मनीयार,नवजीवनचे अनिल कानकरिया,रवी कान्करीया,मीला असोशिएशनच्या वासंती दिघे,सोनाळकर सर,राजकमल पाटील रेदासानी, अनिल कांकरिया, राजू अडवानी आदींनी सह्या केल्या. स्वाक्षरी करणार्यांत महिलांची गर्दी लक्षणिय होती. समाजातील सर्व घटकातील युवक, प्रौढ व वृध्दांनी सह्या केल्या. यात नोकरदार, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांचा समावेश होता. डॉक्टर, वकील आदींसह दारु दुकानदारांनीही स्वाक्षरी केल्याचे आढळून आले. दरम्यान शनिवार 29 एप्रिल रोजी मनपाच्या महासभेत रस्ते हस्तांतरणाच्या संदर्भात विषय क्रमांक 6 वर चर्चा होणार आहे. आज जळगावकरांनी हस्तांतरण विरोधात केलेल्या सह्यांचे निवेदन उद्या सभेपूर्वी महापौरांना सादर केले जाईल.
नवीन बस स्टँड, शिव कॉलनी, भारत नगर, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर, ख्वॉजामिया चौक, स्टेडीयम चौक, महाबळ, भाऊंचे उद्यान, गणेश कॉलनी, मुक्ताईनगर एसएमआयटी कॉलेज, शनी पेठ, अष्टभूजा नगर, खोटे नगर, पंचमुखी हनुमान, रजा मस्जीद, अक्सा नगर, इदगाह कॉलनी, बिलाल मस्जीद, नियातअली फाऊंडेशन शनी पेठ, नवी पेठ या 21 ठिकाणी स्वाक्षरीसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॅलवर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
मुस्लिम वसाहतीत प्रतिसाद
जळगाव फर्स्ट आणि मुस्लिम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरुण परिसरातील अक्सा नगर भागात स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुस्लिम समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष अशफाक पिंजारी,फहिम पटेल व अनेकांचे सहकार्य लाभले. जमीयत उलेमा ए हिन्द जलगांवतर्फे जुन्या मेहरुणमधील मास्टर कॉलनी, अल मन्नान रजा कॉलनी, मलिक नगर परिसरातील मशीदीजवळ स्वाक्षरी घेण्यात आल्या. यासाठी मुफ्ती अतीक , रागिब अहमद, मुफ्ती खालिद, मौलवी एजाज हाफिज शफी पिरजादे यांनी नियोजन केले. जमीयत उलेमा ए हिन्द जलगांव मस्जिद उमर मास्टर कॉलोनी ,जूना मेहरून मशीद मस्जिद अल मन्नान रजा कॉलोनी ,मालिक नगर मुफ़्ती अतीक अध्यक्ष रागिब अहमद सेक्रेटरी जमीयत उलेमा ए हिन्द जलगाव मुफ़्ती खालिद शहर अध्यक्ष मौलवी एजाज़ हाफिज शफी पिरजादे, अशफ़ाक़ पिंजारी फहीम पटेल आदींनी सहकार्य केले.
रस्ते हस्तांतरणला समर्थन किंवा विरोध करण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्यावी. मनपाने रस्ते ताब्यात नाही घेतले तर तेथे महामार्ग, राज्यमार्गसाठीचे नियम लागू असतील. टाऊन प्लानिंगसाठी अडचण निर्माण होईल. ही बाब तपासायला हवी. रस्ते हस्तांतरण नाही केले तर आज आहेत ती दारु दुकाने इतरत्र न्यावी .त्याचा त्रास वस्तीतल्या लोकांना होईल. या विषयाचाही विचार करायला हवा. मी आमदार म्हणून नाही तर नागरिक म्हणून व आंदोलकांच्या विनंतीचा मान ठेवून स्वाक्षरी करीत आहे. माझ्या या भूमिकेचा वेगळा अर्थ कोणीही काढू नये.
सुरेश भोळे, आमदार
लोकांच्या जनमताचा विचार करुन मी निवेदनावर सही करीत आहे. रस्ते हस्तांतरित झाले तर मनपा देखभाल दुरुस्त करु शकत नाही. यासाठी मनपा सरकारकडे अनुदान मागणार आहे.यासंदर्भात सर्व प्रकारची सांगोपांग चर्चा उद्या (दि.29) मनपा महासभेत होईल. तेथे बहुमतानेच निर्णय घेतला जाईल. मनपा आज या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करु शकत नाही हे खरे आहे.
नितीन लढ्ढा, महापौर, जळगाव.