रस्त्यांची गुणवत्ता तपासूनच बिल अदा करण्याची मागणी

0

तळोदा। शहरातींल मुख्य रस्त्यांवर कॉक्रेरिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र मारुती मंदिर पासून तर स्मारक चौका पर्यंतचा रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची गुणवत्ता अधिकार्‍यांमार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक बी.जे. राहासे यांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देवू केली आहे. तळोदा नगर पालीके मार्फत शहरातील् मुख्य रस्ताचा दुर्तफा गटारी व रस्ता कॉक्रेटी करणाचे काम गेल्या सात ते आठ माहिन्या पासून करण्यात येते आहे. हे काम काही ठीकाणी पहिल्याच पावसात वाहून गेले असे असतांना मुख्याघिकारी यांनी आपल्या स्तरावर कुठलीच कार्यावाही केली नाही.

शहाराचा गाभा असलेल्या मेनरोडची अत्यतं दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांची मारुती मंदिरा पासून तर स्मारक चौका पर्यंत गुणवत्ता तपासणी आधिकार्‍यांकडून रस्त्यांची गुणवत्ता तपासणी मुख्याधिकारी यांनी आपल्या स्तरावरून करावी जर आपणा कडून तसे होत नसल्यास उलट टपाली मला कळवावे, मी माझ्या स्तरावरुन रस्त्याची गुणवता तपासणीसाठी आधिकार्‍याची प्रत्यक्ष भेट घेवू त्यांना पाचारण करेल असे म्हटले आहे. रस्त्यांची गुणवत्ता तपासणी होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे कोणते ही बील अदा करू नये अशी मागणी नगर सेवक बी जे राहासे यांनी तळोदा नगर परिषद मुख्याधिकारी यांना लेरवी निवेदन देवू केली आहे.