आंबीमधील ग्रामस्थांनी केली मागणी
वडगाव मावळ : येथील आंबी गावातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, असे येथील नागरिकांची मागणी आहे. तसेच येथील अंधारी ओढ्याजवळील पुलापाशी सांडपाणी साचून रहाते आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याचे शक्यता नाकारता येणार नाही. इंद्रायणीवरील धोकादायक पुलावरून अवजड वाहतूक सुरू आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यावरच सार्वजिक बांधकाम विभागाला जाग येणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आंबी रस्त्याची तसेच धोकादायक पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व नागरिकांची वर्दळ सुरु असते. दुषित पाण्याने रस्ता चिखलमय व निसरडा झाल्याने ये-जा करताना दुचाकी, चार चाकी वाहने घसरून अपघात होवून अनेक वाहन चालक किरकोळ व गंभीर जखमी झाले.
हे देखील वाचा
खडीमुळे वाहनचालक जखमी
आंबी रस्त्यावर ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली खडी दिसून येत आहे. या खडीमुळे वाहनचालक तसेच पादचार्यांना लागून ते जखमी होत आहे. याशिवाय वाहनांमुळे अंगावर डबक्यातील दुषित पाणी उडते. धुळीने दुचाकी व पादचार्यांना ये-जा करणे धोक्याचे आहे. आंबी-मंगरूळ चौकात जलवाहिनी फुटून पाणी एमआयडीसीच्या रस्त्यावर गतिरोधकाजवळ साचत असल्याने तेथे वारंवार अपघात होतात. रस्त्याच्या साईटपट्ट्या खचत आहे. ग्रामपंचायत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सोडते. त्यामुळे या गोष्टींची नोंद घेऊन बांधकाम करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सोमा भेगडे, रामनाथ घोजगे, विक्रम कलावडे, दत्ता कानकुडे, प्रा. सुरेश घोजगे, संतोष घोजगे यांनी केली आहे.