रस्त्यांच्या डागडूजीसह सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाला साकडे

0

भुसावळात मुस्लीम समाजातर्फे रमजानच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला निवेदन

भुसावळ- मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने शहरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येवून शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवावी तसेच सुरळीत पाणीपुरवठा करावा या आशयाची मागणी पालिका प्रशासनाला मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन पालिकेचे अधिकारी अख्तर खान यांनी स्वीकारले.

नाल्यांचीदेखील व्हावी स्वच्छता
निवेदनाचा आशय असा की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते रजा टॉवरपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याची रमजान ईदपूर्वी डागडुजी करावी, ईदच्या पूर्वसंध्येला व ईदच्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात यावा, आनंद, बंधूभाव, प्रेम, त्यागाचे प्रतीक असणार्‍या ईद सणानिमित्त समाजबांधव घराची व परीसराची स्वच्छता करीत असल्याने या पार्श्वभूमीवर मोहम्मद अली रोड (खडका रोड) तसेच आगाखान वाडा ते जाम मोहल्ला पर्यंतच्या रस्त्यावर असलेला नाला तुडुंब भरला असून त्याची साफसफाई ईदपूर्वीच करण्यात यावी, नमाज पठण, रोजा ईफ्तारसाठी मुस्लिम बांधवांना या घाणीतूनच जावे लागत असल्याने नाले, गटारी व रस्त्याची सफाई करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या. ईदच्या दिवशी विवधध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनीधी सुध्दा भेटीसाठी येत असल्याने नागरीकांच्या संतापाचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची काळजी सुद्धा नगरपरीषदेने घ्यावी, असे निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर माजी नगरसेवक साबीर शेख, नगरसेविका जाएरा बी.शेख शब्बीर, शेख साजीद, साजीद बागवान, मुजाहिद शेख, शकील (डीडी) बागवान, मो.युसूफ, शेख रफीक मजीद, नसीम बाबू तडवी, अ‍ॅड.एहतेशाम मलिक, अकबर ठेकेदार, शेख साजीद रोशन, तौसीफ खान खुदियार खान, अब्दुल लतीफ, जमील खान, निसार अहमद, जावेद खान, जावेद अहमद आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.