धुळे । शहरातील प्रभाग क्र. 32 व 17 मधून जाणारा नगरोत्थान योजने अंतर्गत सुरु असलेला डॉ.जे.के. ठाकरे ते बायपास टोलनाका रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आले. मागणीचे निवेदन देताना समाधान शेलार, प्रविण पाटील, महेश पाटील, वसंत नगराळे, कैलास पाटील, गणेश चव्हाण, आनंद वाघ, पी.टी. बेडसे, मनोज वाघ, नाना वाघ, मनोज जैन, भैय्या पवार, डॉ. अशोक पाटील, गोकूळ वाणी, मनोज पाटील, भूषण शिरसाठ आदींनी दिले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्यावर खडींचा खच पडला आहे. काही ठिकाणी गटारीसाठी चार्या खोदण्यात आल्या असून त्याचे काम अपूर्ण आहे. मोठमोठ्या चार्या खोदून तसेच अर्धवट काम सोडून देण्यात आलेला आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे.